गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:44 IST)

प्रियांकाचे लग्न-दीपिकाची रिसेप्शन पार्टी एकाच दिवशी?

बॉलिवूडमध्ये सर्वात अधिक चर्चा होत आहे, ती म्हणजे बड्या स्टार्सची लग्ने. मग ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास असो वा रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण. दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. तर प्रियांका-निक जोनासचे लग्नदेखील चर्चेत आहे. मध्यंतरी, प्रियांकाचे लग्न आणि दीपिकाच्या लग्नाचे रिसेप्शन एकाच दिवशी होणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 14-15 नोव्हेंबरला दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर भारतात दोन रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. एक मुंबईत 21 नोव्हेंबरला तर दुसरे दीपिकाच्या होम  टाऊन बंगळुरुमध्ये 28 नोव्हेंबरला आयोजित केले जाईल. याआधी 1 डिसेंबरला रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात होते. प्रियांका आणि निकयांचे लग्न दीपिकाचे रिसेप्शन सोहळा संपल्यानंतर होणार आहे. प्रियांकाच्या लग्नाचा सोहळा 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दोघांचे जोधपूरच्या उमैद भवन पॅलेसमध्ये लग्न होणार आहे. 21 ऑक्टोबरला दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर कार्ड जाहीर करून आपल्या लग्नाची तारीख सांगितली होती. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दोघे लेक कोमो इटलीतील आलिशान विला डेल बालबियानेलोमध्ये लग्न करू शकतात. रॉयल लग्नासाठी हे ठिकाण प्रसिध्द आहे. लग्न सोहळ्याला 30 पाहुणे येणार असल्याचे वृत्त आहे. लग्नात केवळ कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र-परिवार सहभागी होणार आहेत.