शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (11:56 IST)

प्रसिद्ध गायक कैलाश खैरवर कान्सर्ट मध्ये हल्ला

कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन मुलांनी कार्यक्रम सुरु असताना दोन मुलांनी कैलास खैर यांना पाण्याची बाटली फेकून मारली. सदर घटना रविवारी घडली. 
तीन दिवसीय हंपी महोत्सव 27 जानेवारीपासून सुरू झाला आणि 29 जानेवारीपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रमुख बसवराज बोम्मई यांच्या हस्ते महोत्सवाचेउद्घाटन करण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश खैर हे हंपी महोत्सवात गात असताना दोन मुलांनी कन्नड गाण्यांची मागणी सुरु केली. कन्नड गाणं गायले नाही म्हणून संतापून त्यांनी पाण्याची बाटली कैलास खैर यांच्यावर फेकली. दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप गायकाची प्रकृती कशी आहे माहिती मिळू शकली नाही. 
 
कैलाश खेरबद्दल बोलायचे झाले तर ते बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान गायकांपैकी एक आहेत. कैलाश खेर यांनी अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. गायकाचे 'अल्लाह के बंदे हंस दे...' हे गाणे मनाला भेडून जातं 
 
कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि कन्नड सिनेसृष्टीतील कलाकारांनी परफॉर्म केलं.कन्नड पार्श्वगायक अर्जुन, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.बॉलिवूडमधून अरमान मलिक आणि कैलाश खेर सामील झाले.  
 
Edited By- Priya Dixit