शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 25 जून 2018 (10:19 IST)

मामा - भाचा यांचे नाते बिघडले

अभिनेता गोविंदा आणि त्‍याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्‍यात गेल्‍या दोन वर्षांपासून संबंध चांगले नाहीत.  आता गोविंदा आणि कृष्‍णा यांच्‍यातील नाते आणखी बिघडले आहे, असे कृष्णाची मामी सुनीता आहूजा यांनी सांगितले आहे. 'गोविंदा आणि कृष्णा यांच्‍यातील नाते सुधारतील, असे वाटत नाही.' तर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना सुनीता यांनी आपला राग व्‍यक्‍त केला. त्‍या म्‍हणाल्‍या, 'कृष्णाने नेहमीच गोविंदाचा भाचा आहे असे सांगून फायदा घेतला आहे. आम्‍ही कृष्‍णाला नेहमीच आपलं मानलं आहे. परंतु, तो आमच्‍या माघारी आम्‍हाला नावे ठेवतो.' 

दुसरीकडे कृष्णाने सुनीता यांचा दावा फेटाळला आहे. 'इंडस्ट्रीत चांगले काम केल्‍याने मला ओळख मिळाली आहे. गोविंदाने मला लॉन्च केलं नाही,' असे कृष्‍णा म्‍हणाला.