सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (15:02 IST)

गली बॉयचा नवीन पोस्टर शब्दांचा सामर्थ्य दर्शवितो

गली बॉयच्या हिरो रणवीर सिंह याने या चित्रपटाचे नवीन पोस्टर जाहीर केले आहे जे शब्दांची ताकद दर्शवितो.
पोस्टरमध्ये माइक आणि पेन यांचे मिश्रण करून आकार बनविला गेला आहे जे दर्शवितो की एका रॅपरच्या जीवनात शब्दांची जागा किती महत्त्वाची असते. हे पोस्टर एक फॅनने तयार केले आहे. 
 
हे पोस्टर पाहता पाहता चर्चेत आले आहे. बी-टाउनच्या आयुष्मान खुराना आणि यामी गौतम यांनी या पोस्टरची प्रशंसा करताना सांगितले की पोस्टर फारच शानदार बनले आहे.  
 
चित्रपटाच गाणं 'अपना टाइम आएगा' याने इंटरनेटवर मोठे धमाल केली आहे. 24 तासांत हे 14 ‍ मिलियन वेळा बघण्यात आले आहे. याचे बीट्स अतिशय आकर्षक आहे. 
 
हा चित्रपट धारावीत राहाणार्‍या रॅपरच्या कथेने प्रेरित आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंहाची जोडी पहिल्यांदा बिग स्क्रीनवर दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावणार आहे.
 
गली बॉयच्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्यासोबत रणवीर दुसऱ्यांदा काम करीत आहे. त्यापूर्वी, दोघांनी दिल धड़कने दोमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात रणवीरचा लिनर अवतार बघायला मिळणार आहे.  
 
गली बॉयला रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या अंतर्गत टाइगर बेबीसह एकत्रितपणे प्रोड्यूस केले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होईल.