गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (10:39 IST)

Happy Birthday Prbhas : प्रभास यांच्या वाढदिवस विशेष

प्रभास राजू उप्पलपति यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी झाला. हे तेलगू चित्रपटाचे नायक आहे. यांनी मीटर परफेक्ट, मिर्ची, बाहुबली या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. यांचा  अभिनित बाहुबली चित्रपट खूप गाजला होता.
 
प्रभासचा जन्म चित्रपट निर्माता यू.के. राजू उप्पलापती आणि त्यांची पत्नी शिवकुमारी यांच्या पोटी झाला.प्रभासने 2002 मध्‍ये 'ईश्‍वर' या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2003 मध्ये राघवेंद्र या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते.महाकाव्य बाहुबली: द बिगिनिंगमध्ये शिवेंद्र / महेंद्र बाहुबली आणि अमरेंद्र बाहुबली म्हणून दिसले. हा चित्रपट जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट बनला आणि जगभरातील समीक्षात्मक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळवली. बाहुबली: बाहुबली: द कन्क्लुजनचा सिक्वेल 28 एप्रिल 2017 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. हा चित्रपट जगभरात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. मुख्य म्हणजे प्रभास ने या चित्रपटात बाहुबलीच्या पात्राला न्याय देण्यासाठी 5 वर्षात एकही चित्रपटहाती घेतला नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा