गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2018 (10:17 IST)

अभिनेता इरफान खान आजारी

अभिनेता इरफान खान एका अत्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. याची माहिती खुद्द इरफाननेच ट्विटरच्या माध्यमातून दिली. मला दुर्धर आजार असून सखोल रिपोर्ट येईपर्यंत मी त्याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले. 
 

‘कधी कधी आयुष्य तुम्हाला असा धक्का देतं की त्याची कल्पनासुद्धा तुम्ही कधी केली नसणार. गेल्या १५ दिवसांपासून माझं आयुष्य जणू एक रहस्य कथाच झाली आहे. दुर्मीळ कहाण्यांची माझी शोधमोहीम मला एक दिवस दुर्धर आजारापर्यंत नेईल, हे माला माहित नव्हतं. मी आव्हानांसमोर कधीच हार पत्करली नाही. त्यामुळे या परिस्थितीलाही मी सामोरं जाईन. या कठीण वेळेत माझा मित्र-परिवार आणि कुटुंबीय माझ्यासोबत आहेतच. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, माझ्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका. या आजाराच्या निष्कर्षापर्यंत जेव्हा डॉक्टर पोहोचतील, तेव्हा पुढील १० दिवसांत मी स्वत:च याबाबत पूर्ण माहिती देईन,’ अशी पोस्ट इरफानने ट्विटरवर लिहिली.