गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 एप्रिल 2018 (10:29 IST)

ईशा गुप्ता सोशल मीडियावर ट्रोल

आता ईशा गुप्ता  सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. आणि त्याला कारण आहे कलिंगड खाणाऱ्या ईशा गुप्ताने डाळिंब लिहून इंस्टाग्रामवर केलं शेअर. ईशा गुप्ताने इन्स्टाग्रामवर टरबूज खातानाचा एक फोटो शेअर केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब असे लिहिले. अशात चाहत्यांनी ईशाला टार्गेट करताना तिची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे.
 

एका युजरने ईशाला टॅग करताना लिहिले की, ‘तू प्रीक्लास नक्कीच बंक करून पळून जात असशील.’ ईशाचे चाहते तिला सांगत आहेत की तर डाळिंब नसून टरबूूज आहे. आणखी एका युजरने ईशाच्या फोटोला Watermelon became hotmelon..।अशी कॉमेण्ट दिली. खरं तर पहिल्यांदाच ईशाला अशा पद्धतीने ट्रोल केले जात आहे असे नाही. कारण यापूर्वीही तिला बऱ्याचदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. ईशा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.