तैमूरचीला सांभाळणाऱ्या आयाचा पगार ऐकला का?
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा गोंडस मुलगा तैमूरचीला सांभाळणाऱ्या आयाच्या पगाराविषयी नुकतीच माहिती करीनाने दिली.अरबाज खानचा शो Pinch By Arbaaz khan मध्ये करिनाने अनेक गोष्टींवर दिलखुलास उत्तरं दिली. तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाला अधिकाऱ्यापेक्षाही जास्त पगार दिला जातो असं ऐकलंय असं अरबाज म्हणाला. यावर करिना म्हणाली, “अच्छा… खरंच? त्यांना कसं माहित? पण अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर मंत्रालयाने विचार करायला हवा”. मुलांची खुशी आणि सुरक्षेसमोर पैशाला महत्त्व नसतं, असंही ती म्हणाली. आयाला तुम्ही फक्त एक हजार रुपये दिले तरीही काय फरक पडतो, फरक एवढाच पडतो की तुमचा मुलगा सुरक्षित हातात असावा करिना म्हणाली.