गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आठवड्यातून एकदा येणार्‍या विमानाची नोंद ठेवण्यासाठी 45 लाखांचा पगार

आपली नोकरी निवांत असावी. तिच्यात काम कमी आणि आराम व पगार भरपूर असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. अशी नोकरी सगळ्यांनाच मिळणे कठीण आहे. मात्र ब्रिटनच्या एका बेटावर सुरू झालेल्या नवीन विमानतळावर अशी एक आरामदायक नोकरी आहे. या विमानतळाला इमिग्रेशन ऑफिसरची (अप्रवासन अधिकारी) गरज आहे. या अधिकार्‍याला तिथे आठवड्यातून फक्त एकदा येणार्‍या विमानाची नोंद ठेवावी लागेल. एवढ्याशा कामासाठी त्याला वर्षांला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 50 हजार पौंड म्हणजे सुमारे 45.69 लाख रुपये एवढा पगार मिळेल. बहुधा ही जगातील सर्वात चांगली नोकरी असू शकते. हे विमानतळ 2016 मध्येच बांधून तयार झाले होते. मात्र तिथे पहिले व्यावसायिक विमान एक वर्षानंतर पोहोचले. म्हणूनच या विमानतळाला यूजलेस एअरपोर्ट असे म्हटले जाते. या बेटावर अवघी 4500 लोकसंख्या आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यांमुळे ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, पण या बेटावर वेगवान वारे वाहत असतात. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरण्याचाही धोका असतो. या रम्य बेटावर फार मेहनत न घेता जास्त पगार देणारी ही नोकरी मिळणार्‍याची  चांदीच होईल, एवढे मात्र नक्की.