शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:02 IST)

जबरदस्त डान्स असलेला व्हिडिओ तुफान लोकप्रिय

'तु अखियाँ मिलाके' या पंजाबी गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.  अनेकजण या गाण्यावर डान्स करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत.सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ LiveToDance with Sonali नावाच्या एका युट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. या व्हिडिओत २ तरुणींनी जबरदस्त डान्स केल्याचं पहायला मिळत आहे.

व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून केवळ दोन दिवसांतच हा व्हिडिओ २ लाखांहून अधिकवेळा पाहिला आहे. तसेच अनेकांच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. हा व्हिडिओ १३ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केला होता.  या व्हिडिओत दोन तरुणी डान्स करत असून त्यांची नावं सोनाली आणि रुतुजा असल्याचं म्हटलं आहे. या २.२८ मिनिटांच्या व्हिडिओत दोघींनी उत्तम डान्स केला आहे.