गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (11:01 IST)

Malayalam Actor Kundara Johny Passes Away: मल्याळम अभिनेता कुंद्रा जॉनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Kundara Johny
Malayalam Actor Kundara Johny Passes Away:मल्याळम अभिनेता कुंद्रा जॉनी यांचे मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी कोल्लममधील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.  जॉनीला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'मेप्पडियन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
 
कुंद्रा जॉनी हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या अंत्यसंस्कार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कांजीराकोड के सेंट एंथोनी चर्च होईल. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी स्टेला आहेत, .जॉनी कुंद्राने मल्याळम सिनेमात आपल्या कारकिर्दीची सुरुवात अनेक छोट्या भूमिकांमधून केली. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी 1979 मध्ये पदार्पण केले. 'अग्निपर्वथम' आणि 'निथ्या वसंतम', 'राजाविंते माकन' आणि 'अवनाझी' मधील त्यांच्या दमदार भूमिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली.
 








 Edited by - Priya Dixit