मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मंदिराने सलग पुशअप्‍स मारले, ते पण चक्‍क साडीवर!

अभिनेत्री मंदिरा बेदीने सलग पुशअप्‍स मारल्‍या आहेत. ते पण चक्‍क साडीवर! तिने पुशअप्‍स मारतानाचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिचा हा व्‍हिडिओ सध्‍या व्‍हायरल होत आहे. 
 
अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती आपल्‍या चाहत्‍यांसाठी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्‍ट करत असते. मग ते सुट्‍टी एन्‍जॉय करतानाचे असो वा तिच्‍या खासगी आयुष्‍यातील काही इवेंट्‍समधले. आताही तिने पुशअप्‍सचा जो व्‍हिडिओ अपलोड केला आहे, त्‍यातील तिचा एक्‍सरसाईजचा अंदाज पाहण्‍यासारखा आहे. ४६ व्‍या वर्षीही मंदिरा फिट आहे.