गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (12:41 IST)

मिका सिंगचे स्वयंवर लवकरच !

अनेकदा वादात राहणारा प्रसिद्ध गायक मिका सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या गाण्यांपेक्षा वादांमुळे चर्चेत असणारे मिका सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले  आहे. खरं तर, नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार, प्रसिद्ध गायक मिका सिंग लवकरच नॅशनल टीव्हीवर त्याचा स्वयंवर आयोजित करणार आहे. स्वयंवरच्या माध्यमातून टीव्हीवर जोडीदाराच्या शोधात असलेल्या कलाकारांमध्ये मिका सिंगचेही नाव जोडले जाणार आहे.
 
बॉलिवूडचे हे प्रसिद्ध गायक एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपली नवरी शोधण्यासाठी सज्ज झाले आहे. सिंगरशी संबंधित एका सूत्राने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.हा रिअॅलिटी शो पूर्वी नॅशनल टीव्ही वर झालेल्या  स्वयंवरांसारखाच असेल. काही महिन्यांत ते प्रसारित करण्याचीही योजना आहे.
 
सूत्राने असेही सांगितले की गायक शोमध्ये लग्न करणार नाही, फक्त साखरपुडा करणार  आणि त्यानंतर नात्याला पुढे नेणार .मिका सिंग या शोचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देशभरातून असतील.
 
विशेष म्हणजे नॅशनल टीव्हीवर स्वयंवर आयोजित करणारा मिका सिंग हा पहिला कलाकार नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे स्वयंवर कार्यक्रम राष्ट्रीय टीव्हीवर आयोजित करण्यात आले आहेत. टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत, राखी सावंत आणि मल्लिका शेरावत यांनीही स्वयंवरच्या माध्यमातून आपले जोडीदार निवडले, जरी या तिघांनीही निवडलेल्या  जोडीदारांशी लग्न केले नाही.मात्र राहुल महाजन यांनी बंगाली मॉडेल डिम्पी गांगुलीला    रिअॅलिटी शोमधून जोडीदार म्हणून निवडले. यानंतर त्याने डिंपीसोबत लग्न ही केले.