सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (16:40 IST)

Mithun Chakraborty: अभिनेता मिथुन चक्रवर्तीचे रुग्णालयातील बेडवर असलेले फोटो व्हायरल !

बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीच्या तब्येतीबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला नुकतेच बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही बातमी समोर येताच मिथुनचे चाहते नाराज झाले आहेत. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या अभिनेत्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत विविध अफवा उडू लागल्या आहेत.
 
अभिनेत्याचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने व्हायरल होत असलेल्या फोटोचे सत्य सांगितले आहे. मिमोहने सांगितले की, मिथुनला किडनी स्टोनचा त्रास होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हायरल झालेला हा फोटो रुग्णालयातीलच आहे, ते बेशुद्ध अवस्थेत आहे. आता त्यांची प्रकृती बरी आहे. आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केले असून आता ते घरी विश्रांती घेत आहे. 
 
त्यांच्या तब्बेतीचे अपडेट मिळाल्यावर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 
सर्वजण अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बॉलिवूड डिस्को डान्सर्सचे फोटो शेअर केले आहेत आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.