रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणा

अभिनेता अजय देवगण याचा निर्मित असलेला  सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर रिलीज झाला असून तो फार चर्चेचा विषय झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण तानाजी (तान्हाजी) मालुसरेंची भूमिका करत आहेत. या चित्रपटातील महत्वपूर्ण असलेली भूमिका अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराज साकारत आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाची स्टारकास्ट ट्रेलर रिलीजवेळी उपस्थित जाहली आणि माध्यमांना उत्तरे देत होती. यावेळी एक मोठा  किस्सा घडला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरसाठी टाळ्या तर वाजवल्या आहेतच सोबतच त्याच्या उत्तरावर सोशल मिडीयावर चर्चा करत आहेत.
 
अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, दिग्दर्शक ओम राऊत यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना या सिनेमाबाबत विचारण्यात आलं. या सिनेमात अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून, त्यामुळे शरदला शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न विचारताना पत्रकाराने शिवाजी महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरने लगेच अडवत चूक सुधारत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं म्हणायला सांगितले आहे.
 
शरद केळकरने पत्रकाराची चूक सुधारताच त्याच्या मनातील शिवाजी महाराजांबाबतचा आदर पाहून सर्वच आवाक झाले. शरद केळकरसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या आहेत. या आगोदर केबीस मध्ये महाराज यांच्या बद्दल एकेरी उल्लेख झाला होता, त्याचा फार मोठा फटका या शोला आणि अमिताब बच्चन यांना बसला होता.