शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (10:57 IST)

Nusrat bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये बेपत्ता,टीमशी संपर्क तुटला

nusrat bharucha
Nusrat bharucha :पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील वातावरण तापले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान, नुसरत भरुचाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात ही अभिनेत्री इस्रायलमध्ये अडकली आहे. खुद्द नुसरतच्या टीममधील एका सदस्याने ही माहिती दिली असून अभिनेत्रीच्या संपर्काबाबतच्या वक्तव्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. 
 
नुसरत भरुचाच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. टीम सदस्याच्या म्हणण्यानुसार, 'शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मी तिच्याशी शेवटचा संपर्क साधला, जेव्हा ती तळघरात सुरक्षित होती. सुरक्षा उपायांसाठी, अधिक तपशील उघड करणे शक्य नाही. मात्र, तेव्हापासून आमचा संपर्क होऊ शकलेला नाही.
 
टीमने सांगितले की, 'आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आशा आहे की ती निरोगी आणि सुरक्षित परतेल.' नुसरत लवकर सापडली नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत घेतली जाऊ शकते. हमासने अचानक इस्रायलवर मोठा हल्ला केला आणि एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यामुळे इस्रायलमधील 300 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच 1000 लोक जखमी झाले. हमासच्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागल्याचे वृत्त आहे.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही युद्धाची घोषणा केली आहे. नेतान्याहू म्हणाले की आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशनमध्ये नाही. हमासने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या साफ करण्याचे आदेश मी आधी दिले. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्यांनी कधीच विचार केला नसेल.
 





Edited by - Priya Dixit