शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 19 एप्रिल 2020 (13:02 IST)

पाकिस्तान मीडिया ट्रोल, आमिर खानला ठरवलं हत्या प्रकरणातील आरोपी

बॉलिवूड स्टार आमिर खानचा फोटो चुकीच्या बातमीत वापरल्यामुळे पाकिस्तानी मीडिया चर्चेत आहे. पाक मीडियाच्या या चुकीची चर्चा सोशल मीडियावर होत असून ट्रोलिंग सुरु आहे. 
 
हे आहे प्रकरण
पाकिस्तानातील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी 17 वर्षांपासून तुरूंगात असलेले मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की या पक्षाचे नेते आमिर खान यांची मुक्तता केली आहे. पण पाकिस्तानी न्यूज चॅनेलने ही बातमी दाखवताना MQM नेते आमिर खान यांच्या ऐवजी बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो लावला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी त्यांची चुक सुधारली. पण तोपर्यंत सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला होता.
 
आमिर खानचा फोटो असलेला हा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाक मीडियाच्या या चुकीमुळे त्यांना सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे. नेटकर्‍यांचे मजेशीर कमेंट्स सुरुच आहे.