मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (15:13 IST)

Pankaj Tripathi Father Death:अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन

Pankaj Tripathi Father Death:अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या डोक्यावरून वडिलांची सावली दूर झाली आहे. अभिनेत्याचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले आहे. ते  98 वर्षांचे होते आणि त्यांच्या मूळ गावी बेलसंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेता त्यांच्या मूळ गावी रवाना झाले  आहे.
 
पंडित बनारस तिवारी यांचा मृत्यू काही आजारामुळे झाला की वयाशी संबंधित समस्यांमुळे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. अभिनेत्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज त्रिपाठी मूळचे बिहारमधील गोपालगंजचे आहेत. अभिनय कारकिर्दीमुळे ते मुंबईत राहतात , पण त्यांचे  आई-वडील अजूनही गावातच राहत होते.
 
अभिनेत्याच्या वडिलांवर आज गावातच अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये वडिलांचा उल्लेख केला आहे. लहानपणी गावात त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवून तेअनेकदा भावूकही झाले आहे. 
 
एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने सांगितले होते की त्याच्या वडिलांना त्याच्या कामगिरीमध्ये अजिबात रस नाही. त्यांचा मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नाही. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांना आवडत नव्हत्या.
 
एकदा पंकज त्रिपाठीने एका मीडिया संभाषणात सांगितले की, त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्याने अभिनेता व्हावे. मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. पंकज त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते  'OMG 2' मध्ये दिसत आहे.
 



Edited by - Priya Dixit