गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (14:46 IST)

परिणितीची इच्छापूर्ती

सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण होतात आणि आधी पूर्ण होत नाहीत. अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्या बाबत असाच प्रसंग घडला आणि तिची इच्छा पूर्ण झाली. 
 
परिणिती नुकतीच अभिनेता अर्जुन कपूर याच्यासह आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'ची जाहिरात करण्यासाठी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या 'इंडियन आयडॉल 10'मध्ये आली होती. यावेळी परिणिती म्हणाली की, बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा मी शिकत होते, तेव्हा इंडियन आयडॉलवर येण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावेळी, इंडियन आयडॉलचा पहिला हंगाम टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता आणि मला खरोखरच एकदा तरी या स्टेजवर यायची इच्छा होती. तरीसुद्धा, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि मी माझे गायन पुढे चालू ठेवू शकले नाही, पण आज मला ते भाग्य लाभले आहे.