पूनमने ओलांडल्या मर्यादा
फीफा विश्वचषक 2018 साठीआता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध फीफाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी अनेक सेलिब्रेटी कामाला लागले आहेत. यात काही भविष्यवेत्ते संघांच्या विजयाची भविष्यवाणी करत आहेत. तर, काही मंडळी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. यात मागे राहील ती पूनम पांडे कसली? भारतात नेहमी चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेनेही फीफाच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, हा प्रयत्न टीकेचाही विषय ठरला आहे. पूनम पांडेने फीफाच्या नावाखाली एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील पूनमला पाहून अनेकांना धक्का बसला आहे. फीफाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत आपला शो प्रमोट करण्यासाठी पूनमने हा व्हिडिओ बनवल्याचे समजते. या व्हिडिओत पूनमने जी अंतर्वस्त्रे घातली आहेत ती फुटबॉलच्या रंगाशी साधर्म्य दाखवणारी आहेत. पण, आपल्या सहकार्याला कॅमेर्यासमोर बोलवून पूनम त्याला जे करायला सांगते ते तर आम्ही शब्दात लिहू शकत नाही. पूनमने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. पण, आता तो भलताच व्हायरल होत आहे. दरम्यान, यंदाचा फीफा रशियात पार पडत असून, येत्या 14 जूनपासून त्याचीच सुरूवात होत आहे. साधारण 32 संघ फीफामध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सर्व संघांची आणि त्यांच्या खेळाडूंची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.