बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (12:06 IST)

डॉन-3 मधून प्रियांकाचा पत्ता कट

अल्पावधीतच पार हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्राने मजल मारली आहे. बॉलिवूडमध्ये पण आज तिचा चांगलाच दबदबा आहे. असे असताना देखील बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रियांकाला रिप्लेस केल्याचे वृत्त आहे. होय, प्रियांकाचा पत्ता आगामी डॉन-3 या चित्रपटातून कट झाला असून शाहरुखची नवी रोमा दीपिका असल्याची चर्चा सध्या बीटाऊनध्ये होत आहे. प्रियांकाने डॉनच्या सिरिजध्ये रोमाची व्यक्तिरेखा दमदार पद्धतीने साकारली होती. शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअर्सच्या चर्चा याच चित्रपटाच्या शूटदरम्यान आल्या होत्या. पण आता या देसी गर्लच्या हातून डॉन-3 निसटला आहे. त्यामुळे आता दीपिका जंगली बिल्लीच्या रुपात किती जणांना घायाळ करणार आहे हे लवकरच समजेल. या चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शक फरहान अख्तरने तूर्तास डॉन-3 च्या पटकथेवर काम सुरु असल्याचे संकेत दिले होते. पण एक ट्विट करून त्याने सांगितले की, संपूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय खोट्या बातम्या पसरवू नका. त्यामुळे नक्की या चित्रपटात कोण दिसणार यावर मात्र प्रश्र्नचिन्ह उपस्थित झाले आहे.