सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (08:58 IST)

आता प्रियांका माधुरीच्या जीवनावर विनोदी मालिका बनवणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेच्या ‘एबीसी’ नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार असून, ही मालिका बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित आहे. वेरायटी डॉट कॉम’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला आहे. या मालिकेच्या नावावर सध्या विचार सुरु असून, ही मालिका माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित असल्याचं, सांगितलं.

या मालिकेद्वारे माधुरीने अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर, कशाप्रकारे आपल्या दोन संस्कृतींची जोपासना केली, हे दाखवण्यात येणार आहे. त्याशिवाय तिनं याकाळात आपल्या चमकदार जीवनशैलीत बदल करुन, शांत आणि समाधानी जीवन जगत असल्याचं दाखवण्यात येणार असल्याचंही तिनं यावेळी सांगितलं.