मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त करणारं महाराष्ट्र चौथं राज्य ठरलं आहे. याआधी ओडिशा, केरळ आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.