रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जुलै 2019 (16:21 IST)

बारामती आणि फलटण तालुक्यात दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु

बारामती आणि फलटण तालुक्यात सध्या अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. दबंग 3च्या निमित्तानं सलमान खान याच्यासह अरबाझ खान, सोनाक्षी सिन्हा, महेश मांजरेकर, दिग्दर्शक प्रभु देवा अशा दिग्गज कलाकारांनी चित्रीकरणासाठी हजेरी लावली आहे. 22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.
 
बारामती तालुक्यातील होळ आणि भिकोबानगर येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. यानिमित्ताने पहिल्यांदाच तालुक्यात बड्या अभिनेत्याच्या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील राहुल जगताप या युवकाची ओपन जीपही या चित्रपटात वापरण्यात आली. त्याचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल जगताप यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी आपली ओपन जीप दिली आहे.
 
या चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात आलीय. त्यामुळं चित्रीकरण स्थळी कुणालाही प्रवेश ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे चित्रपटाची दृश्ये चित्रित होत असताना कोणत्याही प्रकारचं (फोटो किंवा व्हिडीओ) करण्यास मज्जाव केला जातो आहे.