सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (19:28 IST)

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसणार

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथ अजून रिलीज झाला नाही तर अजून साराकडे सिनेमांची लाईन लागली आहे. 'केदारनाथ' शिवाय ती रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार तिला इम्तियाज अलीच्या नव्या सिनोची ऑफर‍ मिळाली आहे. 
 
केदारनाथचा टीझर सगळ्यांनाच खूप आवडला आहे. यातील सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. केदारनाथचा टीझर बघून इम्तियाज अलीने सारा अली खानला अप्रोच केले आहे. इम्तियाज अलीने सारा अली खानसोबत आपल्या सिनेमाबाबत चर्चा देखील केली आहे. रिपोर्टनुसार इम्तियाज अलीला सारा अली खानने होकार देखील दिला आहे. मात्र अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. साराच्या अपोझिट यात कार्तिक आर्यन दिसणार आहे. 'केदारनाथ'बाबत बोलायचे झाले तर यात सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.