गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:52 IST)

सेन्सॉर बोर्डाने 'अय्यारी' चे प्रदर्शन थांबवले

दिग्दर्शक निरज पांडे यांच्या 'अय्यारी' चित्रपटावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्यामुळे सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आहे. आधी अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि अय्यारी एकाच दिवशी ९ फेब्रुवारीला रिलीज होणार होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे. 

आधी ‘अय्यारी’हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’ 25 जानेवारीला रिलीज होणार हे ठरले आणि ‘अय्यारी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत 9 फेबु्रवारी ही तारीख निवडली होती.