रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:47 IST)

Aryan Khan Video शाहरुख खानचा मुलगा पुन्हा पार्टीत ड्रिंक करताना दिसला, आर्यन खानचा व्हिडिओ लीक

Aryan Khan Video सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पार्टीचा दिसत आहे. हा पबमधील असल्याचे दिसत असून आर्यन त्याच्या मित्रांसोबत सेलिब्रेशन करताना दिसतोय. दरम्यान कोणीतरी आर्यन खानचा व्हिडिओ बनवला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आर्यन टेबलवरून एक ग्लास उचलतो. पेय घेतो आणि नंतर ग्लास मागे ठेवतो. आर्यनचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक आर्यनची ड्रिंंकवरून टीका करत आहेत तर काही लोकत्याच्या वैयक्तिक आयुष्याचे आदर केले पाहिजे अशा कमेंट देत आहे.