गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (10:00 IST)

सोनम कपूरच्या पदरी अपयश

सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' अपयशी ठरला असून नर्गिस फाखरी आणि सचिन जोशी अभिनित 'अमावस'लाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आठवडाभरात चित्रपटाने 20.08 कोटी रुपये कमावले. समलैंगिक संबंधांवर आधारित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये सोनम कपूरसह अनिल कपूर, जुही चावला, राजकुमार राव अशी तगडी स्टारकास्ट आहे. ती असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाला नाकारल्याचं चित्र आहे. 
 
मधल्या काळात वेगळ्या विषयांवरचे चित्रपट डोक्यावर घेणार्‍या प्रेक्षकांची पावलं 'एक लडकी को देखा'...कडे वळली नाहीत. 'वीरे दी वेडिंग', 'नीरजा', 'पॅडमॅन' आणि 'प्रेम रतन धन पायो'च्या यशानंतर 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'च्या निमित्ताने सोनम कपूरच्या पदरात बर्‍याच काळानंतर अपयश पडलं. पहिल्या दिवशी चित्रपटाने अवघे 75 लाख रुपये कमावले. यामुळे 'अमावस' बॉक्सऑफिसवर फार काळ तग धरणार नाही हे स्पष्ट झालं.