शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (16:08 IST)

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीचा पती रुग्णालयात दाखल,प्रकृती गंभीर

Photo- Instagram
सिनेजगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या पतीची प्रकृती बिघडली आहे आणि आता प्रकरण इतके हाताबाहेर गेले आहे की त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे
 
साऊथ टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मी यांचे पती रवींद्र चंद्रशेखर यांना  श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर आता त्यांच्या  नाकात ऑक्सिजनची ट्यूब टाकण्यात आली आहे. त्याला फुफ्फुसात भयंकर संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे. त्यांना रुग्णालयात आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे.त्यांना  1 आठवडा आयसीयूमध्ये राहावे लागणार आहे.

तमिळ अभिनेत्री महालक्ष्मीचा नवरा बिग बॉसला त्याच्या खाजगी यूट्यूब चॅनेलवर रिव्ह्यू करतो. यासाठी त्याला खूप पसंतीही मिळत आहे. महालक्ष्मीचे पती असण्यासोबतच ते प्रसिद्ध निर्माता म्हणूनही इंडस्ट्रीत ओळखले जातात. 2013 मध्ये त्यांनी 'सुत्ता कढई' चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 2014 साली 'नलनुम नंधिनियुम', त्याच वर्षी 'कोलाई नोक्कू परवाई' आणि 2017 मध्ये 'कल्याणम' या चित्रपटांची निर्मिती केली.
 
महालक्ष्मीच्या पतीचे हे दुसरे लग्न होते. या लग्नापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. 2022 मध्ये त्यांनी टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मीशी लग्न केले. त्यांचे लग्न खूप वादग्रस्त ठरले कारण सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो समोर येताच लोकांना हे जोडपे खूपच विचित्र वाटले. त्यानंतर बॉडी शेमिंगच्या सर्व प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. महालक्ष्मीने पैशासाठी रविंदरशी लग्न केले, असेही लोक म्हणाले.
 
 Edited by - Priya Dixit