मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (17:08 IST)

अभिनेत्री आदिती राव हैदरीचा चित्रपट ‘सूफ़ीयम सुजातायम’चा ट्रेलर प्रदर्शित!

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आदिती राव हैदरी आणि जयसूर्या यांची आगामी सांगीतिक प्रेमकथा 'सूफीयाम सुजातयंम'च्या ट्रेलरचे आज अनावरण करण्यात आले. नारानी पूझा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अभिनेता जयसूर्या आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत असणार आहेत. निर्माता विजय बाबू यांचे प्रॉडक्शन बॅनर फ्रायडे फिल्म हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाद्वारे अदिति राव हैदरी मल्याळम चित्रपट सृष्टित पदार्पण करत आहे.
 
चित्रपटाविषयी बोलताना अदिति राव हैदरी म्हणाली की, "या चित्रपटाद्वारे मी मल्याळम चित्रपट सृष्टित पदार्पण करते आहे. मी स्वत:ला नशिबवान समजते की मी या चित्रपटाचा भाग आहे. हां चित्रपट म्हणजे एक प्रेमळ अशी प्रेमकथा आहे. ज्यामध्ये प्रेम पूर्वग्रह आणि भेदभवापासून मुक्त आहे. ही एक ड्रामा फिल्म असून खूप संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे सादर करण्यात आली आहे."   
 
ही बहुप्रतिक्षित प्रेमकथा 3 जुलै रोजी 200 हून अधिक देश आणि प्रदेशात जागतिक प्रीमियरसाठी सज्ज झाली आहे.