सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

केरळसाठी सनी लिओनीने दिले 5 कोटी रुपये!

केरळमध्ये पुराच्या थैमानामुळे आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकं बळी गेले आहेत. अडीच लाखांहून अधिक लोकं बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशभरातून तसेच बाहेरहून देखील मदतीचे हात पुढे येत आहे.  
 
बॉलीवूडहून देखील शाहरुख, अक्षय यांच्यासह अनेक कलाकार पुढे आले आहे. यात सर्वात चर्चित बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव देखील सामील झाले आहे. सोशल मीडियावरील पोस्टप्रमाणे सनीने केरळमधील लोकांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपये दिले आहेत.
 
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी खरंच सनीने 5 कोटी रूपयांची मदत दिली का? हा खरा प्रश्न आहेच कारण सनीने स्वतः: कुठेही असा दावा केलेला नाही.