बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनी लिओनीला गोळी झाडली, ती लगेच खाली पडली

सोशल मीडियावर सनी लिओनी खूप सक्रिय असते आणि अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी काही शेअर करत असते. परंतू सनीने हल्लीच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ बघून आधी तर तिचे चाहते घाबरले पण नंतर त्यांच्या चेहर्‍यावर हसू आले.
 
हा व्हिडिओ सनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. रात्री शूटिंग होत असल्याचे दिसत आहे. ज्यात एक व्यक्ती तिच्यावर पिस्तूलने लक्ष्य साधत गोळी झाडताना दिसतोय. गोळी लागतात सनी तिथे पडून जाते आणि व्हिडिओ संपेपर्यंत देखील उठत नाही.
 
नंतर सनीने व्हिडिओचा दुसरा भाग शेअर केला आहे. यात ती हसत उठून बसते आणि प्रँक केल्याचं सांगते. त्यात इतर लोकं म्हणताना दिसतात की सनी कमाल अभिनय करते कारण ती उठली नाही तर सर्व घाबरून गेले होते.
 
सनी लिओनीने दोन्ही व्हिडिओजवर एक कॅप्शन लिहिले आहे. पहिल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे- ग्राफिक वॉर्निग- 1 आणि दुसर्‍याला कॅप्शन दिले- ग्राफिक वॉर्निग- 2
 
सनी लिओनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता पर्यंत तिने अनेक प्रँक व्हिडिओज शेअर केलेले आहे.