Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुपरस्टार टाइगर श्रॉफने कॉमिक बुकच्या रचनाकारांना केले प्रेरित!

Updated: मंगळवार, 23 जून 2020 (11:46 IST)
 
जेव्हा पण अ‍ॅक्शन सीन सादर करण्याची गोष्ट येते तेव्हा सर्वात तरुण वयाच्या या अ‍ॅक्शन सुपरस्टारने आपल्या अ‍ॅक्शनचा स्तर प्रत्येक वेळी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. इतका की आता त्याच्या अ‍ॅक्शन व्यक्तिरेखांनी कॉमिक्सच्या रचनाकारांना त्यांच्या अ‍ॅक्शन पात्रांसाठी प्रेरित केले आहे. कॉमिक लेखकांनी आपल्या कॉमिक बुकमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. टाइगर श्रॉफचा संदर्भ ज्या कॉमिक्स बुकमध्ये घेण्यात आला आहे त्याचे नाव 'गॉन केस' आहे.
 
कॉमिक बुकचे लेखक शिव पनिक्कर यांनी म्हटले की, टाइगर भारतीय चित्रपट उद्योगाशी निगडीत सर्वात मोठा कॉमिक्स चाहता आहे आणि त्याचे स्पाइडर-मॅनवर असलेले प्रेम हे तो आपल्या चित्रपटात, स्पाइडर-मॅन लेव्हलचे स्टंट परफॉर्म करून व्यक्त करतो. टायगरचे कौतुक करताना, लेखक पनिक्कर म्हणतात की सोशल मीडियावर टायगरचे ट्रेनिंग व्हिडीओ देखील अत्यंत प्रेरक असतात.
 
लॉकडाउनच्या काळात देखील, हा अभिनेता आपल्या कामाप्रति अतिशय समर्पित आहे. तो नव्या मीटिंग्समध्ये व्यस्त आहे आणि कामाला वेग देण्यासाठी व काम करत राहण्यासाठीच्या प्रत्येक शक्यता तपासत आहे. अभिनेता हल्लीच आपली लोकप्रिय फ्रेंचाइजी बागी 3च्या तिसऱ्या भागात आपल्या दमदार अ‍ॅक्शनसोबत दिसला होता. निश्चितच, या चित्रपटात त्याचा परफॉर्मेंस अविस्मरणीय होता. असा हा सर्वात तरुण अ‍ॅक्शन सुपरस्टार आपला पुढचा चित्रपट 'हीरोपंती 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे, जो 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होण्याची योजना आहे आणि तो टायगरच्या पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. समीक्षकांनी गौरवलेल्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील टायगर आपल्या  पॉवर पॅक आणि  दमदार अ‍ॅक्शन्ससोबत दिसणार आहे, यात शंका नाही. 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

दीपिका पदुकोण आठ महिन्यांची गरोदर असतानाही 'राका' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत फिरायला जायचंय? भारतातील ही १० ठिकाणं देतील देशभक्तीचा खास अनुभव

पत्नी सुनीताच्या अफेअरच्या आरोपांवर गोविंदाने मौन सोडले

ए.आर. रहमान यांच्या मुलाच्या कारचा अपघात; अमीन सुदैवाने बचावला!

'बिग बॉस' फेम लोपामुद्रा राऊतच्या घरात १ कोटींहून अधिक रुपयांची चोरी; दरभंगातून आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments