गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'बत्ती गुल'ला वाणीचा नकार

'टॉयलेट एक प्रेकथा' नंतर दिग्दर्शक नारायण सिंग एका वेगळ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. 'बत्ती गुल, मीटर चालू' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे प्रारंभिक शूटिंग झाल्यानंतर वाणी कपूरने अचानक आगामी शूटिंगसाठी नकार दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
 
बॉक्स ऑफिसवर पडलेल्या 'बेफ्रिके' नंतर वाणीला 'बत्ती गुल, मीटर चालू' मिळाला होता. चित्रपटाचे कामही सुरू झाले होते. पण वाणीने म्हणे अचानक या चित्रपटासाठी नकार दिला आहे. सध्या तरी वाणीच्या या नकारामागचे कारण कळू शकले नाही. पण वाणी गेल्याने दिग्दर्शकाची ऐनवेळी पंचाईत झाली. कारण वाणी गेल्यामुळे तिच्या जागी नवी हिरोईन शोधणे आलेच. अर्थात यासाठी नारायण सिंग यांना फार  कष्टघ्यावे लागले नाहीत. कारण वाणीने सोडताच श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला आहे.