गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (11:17 IST)

वर्षा उसगावकर वाढ दिवस विशेष: या चित्रपटातून ओळख निर्माण केली

मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा आज वाढदिवस आहे. यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्याच्या उसगाव येथे झाला.त्यांचे वडील गोवा केंद्रशासित प्रदेश असताना सभापती होते. घरातील वातावरण राजकीय होते. असे असताना त्यांना लहानपणापासून चित्रपटसृष्टीची आवड होती. वर्षा यांना तीन बहिणी आहे. 
यांचे शिक्षण पणजीच्या डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालयात झाले.त्यांनी गोवा विद्यापीठातून पदवी घेतली. 
'ब्रह्मचारी' या नाटकापासून त्यांनी मराठी रंगभूमीवर 1982 साली पदार्पण केले. 'गंमत जम्मत', 'हमाल दे धमाल', 'सवत माझी लाडकी', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'एक होता विदूषक', 'लपंडाव', 'शेजारी शेजारी', आणि 'अफलातून' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहे. 

या शिवाय त्यांनी 'घर आया मेरा परदेसी', 'तिरंगा', 'पथरीला रास्ता', 'मंगल पांडे : द रायजिंग', 'मिस्टर या मिस', मध्ये काम केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यावर बी आर चोप्रा यांच्या महाभारत  'चंद्रकांता','ती आकाश झेप', 'अलविदा डार्लिंग', 'अनहोनी' मध्ये देखील काम केले आहे.

वर्षा यांना 1990 साली दूरदर्शनवरील मालिका'झांसी की रानी' या मालिकेत त्यांनी झाशी ची राणी भूमिका साकारली. त्यांनी कोकणी म्युझिक अल्बम साठी गाणे गायले आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.