रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:06 IST)

मारिया यांच्या जीवनावर वेब सिरीज बनणार

मुंबईतील मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल झाली, मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील पाळेमुळे खणली गेली त्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या कारकीर्दीवर आधारित वेब सिरीज काढली जाणार आहे. मेघना गुलजार याचे दिग्दर्शन करणार असून रिलायन्स एटंरनेटमेंटच्या फॅन्टम फिल्म ही वेब सिरीज बनवणार आहे. 
 
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त ते मुंबईचे पोलीस आयुक्त पदापर्यंतचा प्रवास यात साकारला जाणार आहे. राकेश मारिया यांचे अनुभव आणि त्यांच्या कारकीर्दीत घडलेल्या अनेक गुन्हेगारी कृत्यांचे कथानक यात असणार आहे. त्यांच्या कारकिर्दीतील १९९३मधील मुंबई बॉम्बस्फोट मालिका, २००३ मधील गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारमधील बॉम्बस्फोट, मुंबईवरील २००८ चा दहशतवादी हल्ला, त्यातील मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब यावर विशेष भर दिला जाणार आहे.