मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (12:08 IST)

शाहरुख- दिलीप कुमार यांचे खास नाते, सायरा बानो म्हणायच्या- जर आम्हाला मुलगा असता तर ...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोकांची लाट उसळली आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला आदरांजली वाहात आहे. दिलीपकुमारशी संबंधित असलेल्या त्याच्या आठवणीही ते शेअर करत आहेत.
 
दिलीपकुमारची पत्नी सायरा बानो नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली. सोशल मीडियावर चाहत्यांना दिलीपकुमारची तब्येतीची अपडेट त्या देत होत्या. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नव्हते. दिलीप कुमार हे बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला मुलासारखा समजत असे.
 
जेव्हा जेव्हा दिलीपकुमारची तब्येत ढासळत होती तेव्हा शाहरुख त्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत असे. सायरा बानोने एका मुलाखती दिलीप कुमार आणि शाहरुख यांच्या खास नात्याबद्दल सांगितले होते. 'दिल आशना है' च्या मुहूर्तावर त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. शाहरुख खानच्या चित्रपटाची पहिली क्लिपिंग दिलीप साहेबांनची केली होती.
 
शाहरुख आणि दिलीप कुमार यांच्याविषयी बोलताना सायरा म्हणाल्या, त्यांच्यात बरीच समानता होती. दोघांचेही केस समान आहेत. मी जेव्हा जेव्हा शाहरुखला भेटते तेव्हा मी त्याच्या केसात बोट फिरवते. सायरा म्हणल्या की आम्हाला मुलगा झाला असता तर तो शाहरुखसारखा झाला असता.
 
तसंच एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने सांगितले होते की ते दिलीप कुमार यांना लहानपणापासूनच ओळखत होते. शाहरुख म्हणाले की, माझे वडील ताज मोहम्मद खान यांचा जन्म आणि ते संगोपन पेशावरच्या त्याच गल्लीत झालं जिथे दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर होते.
 
शाहरुख म्हणाला, मी लहानपणी अनेकदा दिलीप साहेबांना भेटलो. बर्‍याचदा त्याच्या घरी जात होतो. माझी आंटी लंडनहून त्यांचे औषधे पाठवत असत.
 
दिलीपकुमार यांचा जन्म 1 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे झाला होता. त्याचे खरे नाव मुहम्मद युसूफ खान होते. 1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे दिलीप कुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1995 मध्ये दिलीप कुमार यांना भारतीय चित्रपटांचा सर्वोच्च सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.