गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (09:49 IST)

दसरा- दिवाळी अंक "शिवाई"

shivai
साडेतीन मुहूर्तांपैकी एक, असा दसऱ्याच्या शुभमुहूर्त गाठून "शिवाई"चा  दसरा-दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी आला आहे. गुढी पाडवा अंकाला मिळालेल्या उत्फूर्त प्रतिसादानंतर यंदा शॉपिजनतर्फे त्यांचा पहिला वहिला दसरा- दिवाळी अंक तयार केला गेला आहे. 
 
प्रधान संपादक ऋचा दीपक कर्पे यांनी सांगितल्याप्रमाणे अंकासाठी साहित्य आमंत्रित करताना दोन विषय देण्यात आले होते, 'वाईटावर विजय' आणि 'सकारात्मकतेचा उजेड'. 
 
या अंकात याच संकल्पनेवर आधारित सुंदर दर्जेदार साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ अनुभवी लेखकांचे साहित्य तर यात आहेच पण यंदा तरुण पीढीचे, नवी उर्जा देणारे विचार देखील आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहे.  70 हून जास्त साहित्यिकांचे साहित्य अंकात आहे. 
 
शिवाईच्या या 250 पानी अंकात कविता, कथा, लेख, प्रवास वर्णन, आरोग्य, बालविश्व, मुलाखत, व्यक्तिचित्रे, नाट्यछटा व रेसिपीज असे भरपूर साहित्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अंक म्हणजे एक पर्वणी आहे.  कलावंत सारंग क्षिरसागर ह्यांनी जुन्या व नवीन पिढीतील विचारांचा संगम दर्शविणारं, समर्पक व आकर्षक मुखपृष्ठ अंकासाठी तयार केले आहे. 
 
हा अंक शॉपिज़नच्या ऑफिशियल वेबसाइटवर आणि ॲपवर विक्रीसाठी हार्डकव्हर स्वरूपात उपलब्ध आहे.  दर्जेदार साहित्याने नटलेला व आकर्षक चित्रांनी बहरलेला हा अंक संग्रहणीय तर आहेच पण.. दिवाळीत आप्तेष्टांना काहीतरी आकर्षक व "युनिक" भेट देण्यासाठी अत्युत्तम आहे.