सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 9 मार्च 2018 (07:05 IST)

ग्रंथालयांच्या मागण्यांबाबत अर्थसंकल्पात तरतूद करणार

महाराष्ट्रातील ग्रंथालये व ग्रंथालय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत 2018-19 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समिती पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती संपर्क कार्यालयाने दिलेल्या  प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.
 
राज्यातील ग्रंथालय कर्मचार्यांना वेतनश्रेणी व सेवा नियमित शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे लागू करण्यात यावी, तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे, नवीन मान्यता व वर्गवाढ प्रस्ताव शासनाने स्वीकारून पुढील कार्यवाही करावी. कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन  मिळण्याची कार्यवाही व्हावी आदी मागण्यांचे निवेदन अर्थमंत्र्यांना देण्यात आले.
 
या शिष्टमंडळात कुंडलिक मोरे, रवींद्र कामत, सुनील कुबल, अक्रूर सोनटक्के, रमेश सुतार, बाबासाहेब कोल्हे, रिजवान शेख आदींचा समावेश होता.