शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

'सिक्युरिटी मॅनेजमेंट'मध्ये करीयर

ND
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीने (इग्नू) सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, डिग्री कोर्स करू केला आहे. या व्यतिरिक्त 'सिक्युरिटी मॅनेजमेंट' विषयात पीएचडी करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.

युनिवर्सिटीने आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला कोर्स सुरू करण्यासाठी सिक्युरिटी स्किल्स काऊंसिल ऑफ इंडियाची (एसएससीआई) मान्यता मिळवली आहे. इग्नूचे कुलगुरू राजशेखरन् पिल्ले यांच्या मते भविष्यात 'सिक्युरिटी मॅनेजमेंट' या अभ्यासक्रम व तो पूर्ण करणार्‍या उमेदवाराला चांगले महत्त्व प्राप्‍त होईल.

विकसित देशांनी या गोष्टीचे महत्त्व आधीच समजून घेतले असून त्या मार्गाने त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. भारत मात्र कासव गतीने अजून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्‍न करत आहे. इग्नू 'सिक्युरिटी मॅनेजमेंट' व त्या संदर्भात विविध विषयांची शिकवण्यासाठी सिक्युरिटी तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.

एसएससीआईचे अध्यक्ष व संचालक आर.के. सिन्हा यांच्या मते सिक्युरिटी मॅनेजमेंट म्हणजे केवळ सुरक्षा गार्ड तैनात करून त्यांच्या हातात दंडा व बंदूक देणे नव्हे तर निरिक्षण, देखरेख व रात्रीच्या वेळी गस्त घालणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी आधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे.

एसएससीआईच्या माध्यमातून देशात 40 शहरांमध्ये सिक्युरिटी ट्रेनिंग सेंटर सुरू केले जाणार आहे. इग्नूच्या 'सिक्युरिटी मॅनेजमेंट'च्या अभ्यासक्रमाला हे ट्रेनिंग सेंटर पूरक ठरणार आहेत.