सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

बाळाला का असते अंगाई गीताचे आकर्षण?

WD
आईने गायिलेले अंगाई गीत ऐकून बाळाला सुखाची झोप का लागते असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. या आकर्षणाचे मूळ बाळ आईच्या गर्भात असतानाचा रूजलेले असते. गर्भात असतानाच बाळाला आईच्या आवाजाची, तिने गायिलेल्या गाण्यांची सवय झालेली असते. त्यामुळे जन्मल्यावरही ते आईचा आवाज ओळखून सुरक्षित व शांतपणे झोपी जाते.

ब्रिटनच्या नॅशनेल हेल्थ सर्व्हिसकडून याबाबतची एक पाहणी करण्यता आली. त्यात आईचे व बाळाचे दृढ संबंध तपासून पाहण्यात आले. चेल्सिया आणि वेमिंस्टर हॉस्पिटलमध्येही अशाच प्रकारची एक कार्यशाळा घेण्यात आली. तज्ज्ञांनी या कोर्सला 'वूम्ब साँग' असे नाव दिले. गर्भवती असताना गाणे गायिल्याने महिलांच्या शरीरातून आनंदाचे हार्मोन्सही स्त्रवू लागतात. त्यामुळे स्वत: मातेला तणावरहीत होण्यास मदत मिळते तसेच गर्भवती बाळावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो. गर्भवती असताना बाळाने ऐकलेला आईचा आवाज त्याला जन्मल्यानंतरही मदत करीत राहतो.