सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:25 IST)

राज्यात मंगळवारी कोरोनाचे 113 नवे रुग्ण

राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाचे 113 नवे रुग्ण आढळून आहेत. तर अॅटिव्ह रुग्णांची संख्या देखील हजारांच्या खाली पोहचली आहे. राज्यात सध्या 714 अॅटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,तर 127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
 
चार कोरोना मृतांमुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहेय. तर आत्तापर्यंत 77,26, 790 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आतापर्यंत 7, 97, 31, 899 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.