1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मे 2020 (08:24 IST)

आनंद महिंद्रा यांचं आशादायी ट्विट

Anand Mahindra
एका व्यक्तीने फक्त दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवला आहे. हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून शेअर केला आहे. यातून त्यांनी अर्थव्यवस्था कशी संतुलित करता येईल हे सांगितलं आहे. ते म्हणाले की, रोडच्या नियमांचं हे नक्कीच उल्लंघन आहे. पण सोमवारच्या सकाळी मी या फोटोला आशा म्हणून पाहत आहे. कारण दोन चाकांशिवाय कदाचित आपण आपल्या अर्थव्यवस्थेला संतुलन बनवत पुढे नेण्यासाठी रस्ता शोधू शकतो. 
 
सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी खूप व्हायरल होत असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच २ हजारपेक्षा अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ चांगलाच प्रतिसाद दिला आहे.