रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (19:29 IST)

काळजी घ्या ! कोरोना व्हायरस पाण्यात आढळले ,संशोधनात हे उघडकीस झाले;

लखनौ. कोरोनाव्हायरस पाण्यात सापडले आहेत.3 ठिकाणी घेतलेल्या नमुन्यांमध्ये एक नमुना पॉझिटिव्ह आढळला आहे. आता पाण्यात पसरणाऱ्या या विषाणूचा परिणाम मानवांवर काय होईल,त्यावर संशोधन केले जात आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातही पाण्यात कोरोनव्हायरस आढळले आहेत. एसजीपीजीआयच्या मायक्रोबायोलॉजी विभागा मार्फत हे संशोधन केले जात आहे.
मृतदेह विविध नद्यांमध्ये प्रवाहित केल्या नंतर आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओने देशभरात अभ्यास करण्याचे नियोजन केले होते. पूर्वी लोकांनी गंगा नदीत अनेक मृतदेह वाहिले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी पीजीआयच्या रूग्णांमध्ये संशोधन केले गेले होते, त्यावेळी असे आढळले होते की मलात उपस्थित व्हायरस पाण्यापर्यंत पोहोचू शकतो.
अशा परिस्थितीत कोरोनाव्हायरसने ग्रस्त असलेल्या सर्व रूग्णांच्या स्टूल (मल)पासून सांडपाण्यापर्यंत कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतर अनेक संशोधन  पेपर्समध्ये असेही समोर आले आहे की 50 टक्के रुग्णांच्या मल विषाणू सांडपाण्यापर्यंत पोहोचतात.