रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (07:13 IST)

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

परराज्यातून येणाऱ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. १४ दिवस त्यांच्यावर नजर ठेवल्यावरच नंतर त्यांना घरी सोडण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे करणं आवश्यक आहे. मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ५ हजार क्वारंटाईन सेंटरमध्ये १३ लाख लोकांची नोंदणी करण्यात आली आहे. ३१ मे ला सरकारने केलेल्या घोषणेनुसार ब्लॉक स्तरावरची सर्व क्वारंटाईन केंद्रे १५ जूनपासून बंद केली जातील.
 
आता यापुढे बिहारमध्ये येणारे प्रवासी कामगार, विद्यार्थी किंवा इतर लोकांना क्वारंटाईन केले जाणार नाहीये. बिहार राज्यातील क्वारंटाईन सेंटर १५  जूनपासून बंद करण्यात येणार आहेत. नितीश सरकारने निर्णय घेतला आहे की, आता जो कोणी परत येईल त्यांची क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यासाठी नोंदणी केली जाणार नाही.