मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (08:26 IST)

बाळाला दूध पाजणं सोडू नका, त्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही

कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या बाळांना दूध पाजणं महिला सोडत असल्याचं समोर आलं होतं. दूध पाजताना बाळाला देखील आपल्याकडून कोरोनाची लागण होऊ शकेल, या भितीपोटी या महिलांनी बाळाला दूध पाजणं सोडल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता अशा मातांसाठी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली असून कोरोनाबाधित असाल किंवा झालात तरी आपल्या बाळाला दूध पाजणं सोडू नका, त्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही, असं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
 
कोरोनाची लागण झालेल्या मातांची बाळांना दूध पाजण्यावरून होणारी चिंता ओळखून केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाने  त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आईचं दूध बाळाच्या कोरोनापासून संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. जरी आई स्वत: कोरोनाबाधित असली, तरी दूध पाजल्यामुळे बाळाला कोरोनाची लागण होत नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेली नियमावली सगळ्यांनी पाळायला हवी’, असं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.