गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (08:18 IST)

कोरोना अपडेट : ८ हजार १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण दाखल

राज्यात मंगळवारी ८ हजार १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ९ हजार ५१६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
 
तसेच ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकू १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८२ लाख ५१ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९ हजार ५१६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ३४ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २३ हजार ८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.