सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (08:26 IST)

दिलासादायक ! राज्यात 1,976 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात कोरोना  बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचीसंख्या वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या जवळपास आली आहे.  राज्यात बुधवारी 1 हजार 094 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 976 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 लाख 932 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 447 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु  आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 35 लाख 22 हजार 546 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 20 हजार 423 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 29 हजार 714 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 870 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.