शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (18:24 IST)

CoronaVirus India Update: कोरोनामुळे 52 लाखाहून अधिक संक्रमित, 84,372 मृत्य

देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग वाढत असून गुरुवारी संख्या 52 लाखाच्या पलीकडे पोहचली जेव्हाकि यामुळे आतापर्यंत 84,372 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
आतापर्यंत 41,12,552 रुग्ण बरे झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
मागील 24 तासात 96,424 नवीन रुग्ण आल्याने आकडा 52,14,678 वर पोहचला आहे. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 10,17,754 इतकी झाली आहे.
 
देशात कोरोनाचे वाढत असलेली रुग्ण संख्या बघत केंद्र सरकारने राज्यांना यावर नियंत्रणासाठी टेस्ट संख्या वाढवावी असे सांगितले आहे.
 
आरोग्य मंत्रालयाप्रमाणे देशात सध्या 10,17,754 रुग्णांवर कोरोना व्हायरसचा उपचार सुरु असून हा आकडा एकूण संख्येचा 19.52 टक्के आहे.