शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 10 मे 2020 (12:48 IST)

जितेंद्र आव्हाड यांची भावनिक पोस्ट : ‘कितनी बार तूटा लेकिन, अपनो के लिये जीता हूं’

राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना ७ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यांनी आज ट्विटरद्वारे जनतेचे आभार मानले आहेत.

ते म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.“माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.

‘माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.